'श्रीवामनराज प्रकाशन' संस्थेची संक्षिप्त माहिती
श्रीदत्तसंप्रदाय, श्रीनाथसंप्रदाय व श्रीभागवत(वारकरी) संप्रदाय यांचे थोर अध्वर्यू,
शक्तिपातविद्येचे महान आचार्य प.पू. सद्गुरु श्री. श्री. द. (मामा) देशपांडे महाराज यांनी, त्यांचे सद्गुरु योगिराज
प.पू. श्री. वा. द. गुळवणी महाराज यांच्या नावाने १९८३ साली 'श्रीवामनराज प्रकाशन' या संस्थेची स्थापना केली.
'श्रीपाद सेवा मंडळा'चा 'संलग्न प्रकाशन विभाग' म्हणून 'श्रीवामनराज प्रकाशन' ही संस्था कार्य करते.
'पारमार्थिक प्रगती व आत्मोद्धारासाठी योग आणि बोध या दोन्ही अंगानी व्यक्ती परिपूर्ण व्हावी
लागते. साधनेने योगाभ्यास घडतो; परंतु बोध पक्का होण्यासाठी शास्त्रग्रंथांच्या, संतसाहित्याच्या अभ्यासाची
नितांत आवश्यकता असते.', अशी प.पू. सद्गुरु श्री. मामांची ठाम भूमिका होती. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात
या ग्रंथांचा मुळातून अभ्यास करणे अवघड आहे, हे जाणून प.पू. सद्गुरु श्री. मामांनी मोजके, निवडक,
साररूप आध्यात्मिक वाङ्मय प्रकाशित करण्याचे ठरविले आणि प.पू. सद्गुरु योगिराज श्री. वा. द. गुळवणी महाराजांच्या संकल्पनेप्रमाणे
प.पू. सद्गुरु श्री. मामांनी 'श्रीवामनराज प्रकाशन' या संस्थेसाठी काही मार्गदर्शक सूत्रे व उद्दिष्टे निश्चित केली.
तदनुसार 'श्रीवामनराज प्रकाशन' ही संस्था १९८३ सालापासून अखंड व अव्याहतपणे कार्यरत आहे.
संस्थेचे प्रकाशन कार्य
टीप : पुढील विभागांमधील ग्रंथांबद्दल अधिक माहिती आणि ग्रंथ खरेदी-सुविधा जाणून घेण्यासाठी ग्रंथाच्या मुखपृष्ठावर क्लिक करावे.
संस्थेची नूतन प्रकाशने
अलीकडील काळातील पुनःप्रकाशने
संस्थेची लोकप्रिय प्रकाशने (५ पेक्षा अधिक वेळा पुनर्मुद्रण झालेली व वारंवार पुनर्मुद्रित होत असलेली प्रकाशने)
ग्रंथकर्ते व ग्रंथसंपदा
विषयपरत्वे ग्रंथविभागणी
(विषयासंबंधी ग्रंथ पाहण्यासाठी विषयावर क्लिक करावे.)
प्रकाशन सूची, प्रकाशन पत्रिका, प्रकाशन प्रकल्प व संस्थेची वितरण केंद्रे
(अधिक माहितीसाठी Photo वर क्लिक करावे.)
विविध
(अधिक माहितीसाठी मजकूरावर क्लिक करावे.)
अभ्यास संसाधने
(अधिक माहितीसाठी मजकूरावर क्लिक करावे.)
डिजिटल/ई-बुक्स स्वरूपात वाचनास उपलब्ध साहित्य
(वाचनासाठी मजकूरावर क्लिक करावे.)
दूरचित्रवाणी वाहिन्या, Social Media इत्यादींवर सादरीकरण केले गेलेले आमच्या ग्रंथातील काही अभंग.